महाराष्ट्र शासन | GOVERNMENT OF MAHARASHTRA



ग्रामपंचायतचा सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
ग्रामपंचायत डोहोळे अंतर्गत विविध सामाजिक, आरोग्य, शिक्षण व स्वच्छता उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले आहेत. गावातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कर्मचारी, आरोग्यसेवा, अंगणवाडी व शाळांच्या माध्यमातून सातत्याने काम सुरू आहे.
ग्रामपंचायत डोहोळे, ता. भिवंडी, जि. ठाणे ही स्थानिक स्वराज्य संस्था असून तिच्या अंतर्गत डोहोळे, कोशींबी, कळंबोली, आन्हे आणि सोर ही गावे समाविष्ट आहेत. या ग्रामपंचायतीचे मुख्य उद्दिष्ट गावांचा सर्वांगीण विकास, नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे आणि शासकीय योजना प्रभावीपणे राबविणे हे आहे.
ग्रामपंचायतीमध्ये विविध पदांवर कर्मचारी कार्यरत असून ते प्रशासन, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि तांत्रिक सेवा सांभाळतात. वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, संगणक परिचालक, सफाई कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी व इतर कर्मचारी गावाच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी पार पाडतात.
2011 च्या जनगणनेनुसार ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या 4956 आहे. विविध गावांमध्ये लोकसंख्या व कुटुंब संख्या वेगवेगळी असून डोहोळे गावात सर्वाधिक लोकसंख्या आढळते.
ग्रामपंचायत कर्मचारी तपशील व संपर्क माहिती
ग्रामपंचायतीतील सर्व कर्मचाऱ्यांची नावे, पदे आणि मोबाईल क्रमांक यांची सविस्तर माहिती या पत्रकात दिली आहे. नागरिकांना आवश्यक सेवा मिळवण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क साधणे सोपे व्हावे, हा यामागचा उद्देश आहे.
2011 जनगणना अनुसार ग्रामनिहाय लोकसंख्या माहिती
या पत्रकात 2011 च्या जनगणनेनुसार विविध गावांची एकूण लोकसंख्या तसेच अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर घटकांची संख्या दिली आहे. या माहितीमुळे ग्रामपातळीवरील लोकसंख्येचे सामाजिक विभाजन समजून घेण्यास मदत होते.
ग्रामपंचायत क्षेत्रातील कुटुंबांची संख्या
या पत्रकात ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक गावातील कुटुंबांची संख्या दिली आहे. या माहितीमुळे गावनिहाय कुटुंबांची एकूण संख्या समजून घेऊन विविध योजना व सुविधा नियोजनासाठी मदत होते.
गावनिहाय भौगोलिक क्षेत्र व जमिनीचा तपशील
या पत्रकात ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावाचा भौगोलिक क्षेत्रफळ, जंगल क्षेत्र, शेतीसाठी उपलब्ध जमीन तसेच पिकाखालील क्षेत्र यांचा सविस्तर तपशील दिला आहे. या माहितीमुळे ग्रामविकास नियोजन, शेती व्यवस्थापन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य नियोजन करण्यास मदत होते.
गावनिहाय आशा सेविका व संपर्क तपशील”
या पत्रकात ग्रामपंचायत क्षेत्रातील आशा सेविकांची नावे, संबंधित गावे आणि त्यांचे मोबाईल क्रमांक दिले आहेत. नागरिकांना आरोग्य सेवा, लसीकरण, माता व बाल आरोग्य संबंधित मदत मिळण्यासाठी आशा सेविकांशी सहज संपर्क साधता यावा, हा यामागचा उद्देश आहे.
गावनिहाय अंगणवाडी कार्यकर्ती व संपर्क तपशील”
या पत्रकात ग्रामपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी कार्यकर्त्यांची नावे, संबंधित गावे आणि त्यांचे मोबाईल क्रमांक दिले आहेत. बालकांचे पोषण, आरोग्य, पूर्व प्राथमिक शिक्षण तसेच महिला व बाल विकास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे.
जि.प. शाळा व मुख्याध्यापक संपर्क तपशील”
या पत्रकात ग्रामपंचायत क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांची नावे, संबंधित शाळा/गावे आणि त्यांचे मोबाईल क्रमांक दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित माहिती, शालेय उपक्रम व प्रशासनिक कामांसाठी मुख्याध्यापकांशी संपर्क साधणे सुलभ व्हावे, हा यामागचा उद्देश आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांची झलक
- मोफत रुग्णवाहिका
- ऑक्सिजन पार्क
- I Love Dohole गार्डन
- सुंदरबन
- वैष्णोदेवी मंदिर
- वॉटर ATM
- श्री दत्त मंदिर
- मातोश्री हृधाश्रम
- मेडिटेशन सेंटर
-








अभिप्राय | वेबसाइट धोरणे | आमच्याशी संपर्क साधा |संकेतस्थळ अभ्यागत सारांश | मदत | वेब माहिती व्यवस्थापक
विकसित आणि होस्ट केलेले Digiexpres Tech Solution
शेवटचे अद्यावत: March 29, 2026













